चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:13 PM2018-12-07T15:13:12+5:302018-12-07T15:13:33+5:30
वणी : जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या खंडेराव मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध धार्मिक कार्यक्र म होणार आहेत.
वणी : जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या खंडेराव मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध धार्मिक कार्यक्र म होणार आहेत. भगवान शंकराने खंडेरावाचा अवतार घेऊन जेजुरी येथे मणि व मल्ल या दैत्यांचा वध केला तर भगवतीने सप्तशृंगगडावर महिषासुराचा वध केला. यानंतर खंडोबा व भगवतीची वणी येथे भेट झाली अशी आख्यायिका या मंदीराबाबत सांगण्यात येते. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आहे. खंडेराव भक्त व भाविक मंदिरात घटी बसतात. मल्हार नवरात्रास प्रारंभ झाला असुन या काळात माहात्म्य व इतर धर्म ग्रंथ याचे पठण करण्यात येते. चंपाषष्ठीला चांदोरी व सायखेडा येथुन कावड धारकांनी आणलेल्या गोदावरीच्या तीर्थाने मुर्तीला जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. त्यानुसार नियोजन आखण्यात आले आहे . चंपाषष्ठीदिनी सकाळी सात वाजता जलाभिषेक व महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी खंङेराव महाराजांचा विवाह सोहळा रंगणार आहे. सायंकाळी सुशोभित रथात खंडेराव महाराजांची मुर्ती ठेवुन शहरातील प्रमुख मार्गावरु न शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म होणार आहे. प्रसादाचे वाटपानंतर रात्रभर राहडी जागरण अग्नितुन मार्गक्र मण लंगर तोडणे आदी धार्मिक कार्यक्र म होणार असल्याची माहिती खंङेराव भक्त पुंजाराम पानसरे व खंडेराव महाराज यात्रोत्सव समीतीने दिली. दरम्यान, मंदिर व मुर्तीची रंग रंगोटी सुशोभिकरण परिसर स्वच्छता दुकांनासाठी स्टॉल याचे नियोजनाबरोबर खडक सुकेणे येथुन खास बारा गाड्या यात्रोत्सवासाठी तयार करु न घेण्यात आल्या आहेत. चंपाषष्ठीच्या यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे.