येवल्यात शिवजन्मोत्सव पूर्वतयारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 09:59 PM2020-02-12T21:59:29+5:302020-02-12T23:56:50+5:30
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सुभाष पहिलवान पाटोळे होते.
येवला : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सुभाष पहिलवान पाटोळे होते.
मोटारसायकल रॅलीसह मिरवणूक, सायकल स्पर्धा आदी कार्यक्र मांचे नियोजन यावेळी करण्यात आले. बैठकीत विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि शिवजन्मोत्सव कसा साजरा करावा याबाबत ठराव पारित करण्यात आले. सर्व शिवप्रेमी पांढरा अथवा भगवा पोशाख परिधान करून मिरवणुकीत सामील होणार आहेत. सोमवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजता शिवजयंती मिरवणूक मार्गावर सडा, रांगोळी, भगवे ध्वज लावण्यासाठी युवकांची पायी फेरी शहरातील विविध मंडळांना भेटी देणार आहे. प्रास्ताविक युवराज पाटोळे यांनी केले. बैठकीस आनंद शिंदे, शैलेश देसाई, बालू परदेशी, रमाकांत भावसार, संजय शिंदे, किशोर सोनवणे, धनंजय कुलकर्णी, प्रशांत शिंदे, अलकेश कासलीवाल, डॉ. भूषण शिनकर, राहुल लोणारी, तरंग गुजराथी, संजय सोमासे, जयंत पेटकर, विवेक चव्हाण आदी उपस्थित होते.
मंगळवारी (दि. १८) सकाळी ९ वाजता पाटोळे गल्लीतून मोटारसायकल रॅली काढून प्रबोधन करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता पाटोळे गल्ली येथून मिरवणुकीला सुरु वात होणार आहे. गुरुवारी (दि. २०) सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.