भात-नागलीची रोपे तयार; मात्र पावसाअभावी लावणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:46+5:302021-07-15T04:11:46+5:30
पेठ : एकीकडे भात व नागलीची रोपे तयार झाली असताना एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने वाढ झालेली रोपे लावण्याची ...
पेठ : एकीकडे भात व नागलीची रोपे तयार झाली असताना एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने वाढ झालेली रोपे लावण्याची कामे पूर्णपणे खोळंबली असल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पेठ तालुक्यात दरवर्षी आषाढी एकादशीपर्यंत भाताची लावणी पूर्ण होत असते. मात्र यावर्षी जुलै महिन्याचे १५ दिवस संपून गेले तरी पावसाने सुरुवात न केल्याने पूर्ण वाढ झालेली रोप लावणी कशी करावी, असा प्रश्न उभा राहिला आहे.
शेतीची कामे ठप्प
ऐन भात व नागलीची लावणी सुरू करण्याच्या काळात पाऊस नसल्याने पेठ तालुक्यातील शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, पावसाशिवाय लावणी करणे शक्य नसल्याने ऐन खरीप हंगामात शेतकऱ्याचे औत उभे राहिले आहे.
----------------
पेठ तालुक्यात तयार झालेली नागलीची रोपे. (१४ पेठ भात)
140721\14nsk_14_14072021_13.jpg
१४ पेठ भात