तिसऱ्या लाटेत औषधांचा काळाबाजार टाळण्यासाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:56+5:302021-08-24T04:18:56+5:30

कोरोनाची भयावह दुसरी लाट बरेच काही शिकवून गेली आहे. त्यातून खूप अनुभव आले आहेत. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना ...

Preparing to avoid the black market of drugs in the third wave | तिसऱ्या लाटेत औषधांचा काळाबाजार टाळण्यासाठी सज्जता

तिसऱ्या लाटेत औषधांचा काळाबाजार टाळण्यासाठी सज्जता

googlenewsNext

कोरोनाची भयावह दुसरी लाट बरेच काही शिकवून गेली आहे. त्यातून खूप अनुभव आले आहेत. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना सक्षमपणे करता येईल. दुसऱ्या लाटेत रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा काळाबाजार झाला होता; परंतु टास्क फोर्सच्या माध्यमातून त्यावर आळा घातला. साठेबाजी बंद करण्यात यश मिळविले आहे. इंजेक्शन विक्रीत सुसूत्रता आणली. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला होता. आता तशी परिस्थिती राहिली नाही. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन निर्मितीचा मोठा प्रकल्प साकारण्यात येत आहे. सुमारे ५३ मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सर्वप्रकारचे तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून दिले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय जिल्ह्यात १२ रिफिलर आहेत. त्यांची एकूण साठवणूक क्षमता २२८ मेट्रिक टन टॅंक इतकी आहे. म्हणजेच ऑक्सिजनबाबत आपला जिल्हा स्वयंभू ठरणार आहे. औषध उत्पादन करण्याचा परवाना डीसीजीआयकडून घ्यावा लागत असला तरी औषध चाचणीसाठी फास्टट्रॅकवर टेस्टिंग लायसन्स उपलब्ध करून दिले जाते. त्यांना प्रोत्साहन दिले जाते. औषध विक्रेत्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

दुसऱ्या लाटेत अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील जवळपास सर्वच अधिकारी आणि कर्मचारी फिल्डवर काम करीत असल्याने ते सर्वच पॉझिटिव्ह झाले होते. तरी संकटकाळात या विभागाने जोमाने काम केले. ज्या औषध विक्रेत्यांनी नियमबाह्य कामे केलीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. काही विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले. काही दुकाने सील केली. त्यामुळे विक्रेत्यांनीसुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना रुग्णांना घरपोहोच औषधे उपलब्ध करून दिलीत. भविष्यातदेखील औषध विक्रेत्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले जाईल. चुकीचे काम केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दुष्यंत भामरे, सहआयुक्त

(औषध) अन्न व औषध प्रशासन,

नाशिक विभाग

230821\23nsk_7_23082021_13.jpg

दुष्यंत भामरे.सहआयुक्त (औषध) अन्न व औषध प्रशासन.नाशिक विभाग

Web Title: Preparing to avoid the black market of drugs in the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.