जिल्ह्यात बाप्पाच्या स्वागताची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:08 AM2019-09-02T00:08:39+5:302019-09-02T00:09:29+5:30
नाशिक : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, रविवारपासून स्थानिक बाजारपेठ गजबजली आहे. बाणगंगा नदीकाठच्या गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरात गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
सिन्नर शहरातील नाशिक वेस भागात गणेशोत्सावच्या पार्श्वभूमीवर बाजारात झालेली ग्राहकांची गर्दी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, रविवारपासून स्थानिक बाजारपेठ गजबजली आहे. बाणगंगा नदीकाठच्या गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरात गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
सार्वजनिक मित्रमंडळांची घाई दिसून येत आहे. मेनरोड, दाभाडे चौक, क्र ांती चौक, सावरकर चौक, माधवराव पहिलवान नगर, काठेनगर, कारखाना रोड, स्टेशन रोड, शिवाजी चौक, हायस्कूल रोड आदी भागात सार्वजनिक गणेशमंडळांनी मंडप टाकले आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ओढवलेल्या जलसंकटामुळे अनेक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे.
सिन्नर : शहरात गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी रस्त्यातच दुकाने थाटल्याने ग्राहकांची खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी पाहयाला मिळत आहे.
गणेशपेठेतील रस्त्यावरून ये-जा करणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे नवा पूल परिसरात शनिवारी (दि.३१) शहरवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हरतालिका, गणेश चतुर्थी हे सण एकामागून एक येत असल्याने साहित्याच्या विक्रीची दुकाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्यावसायिकांनी रस्त्यातच थाटली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर मध्यभागी व्यावसायिक बसत असल्याने, ग्राहक वस्तू घेण्यासाठी गर्दी करीत असल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने किरकोळ स्वरूपात भांडणे होण्याचे प्रकार घडत आहे.गौरी-गणपतीची तयारी कसबे सुकेणे शहरात गणपतीपाठोपाठ सोनपावलांनी येणाऱ्या गौराईच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मुखत: महिलावर्ग या तयारीत पुढे असून, कसबे सुकेणेत क्र ांती चौक भागात गौरी महालक्ष्मीची स्थापना घरोघरी होते. त्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सुरेखा औसरकर यांनी दिली.पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी या संकटामुळे यंदा आम्ही साधेपणाने गणेशोत्सव साजरा २करीत असून, यंदा आरास साकारली जाणार नाही.
- विलास पवार, जय बजरंग युवा शक्ती मित्रमंडळ, कसबे सुकेणेबाजारपेठेत गर्दी
गणेशोत्सवामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील मंदीचे सावट दूर होऊन चैतन्य पसरले आहे. कसबे सुकेणे बसस्थानक भागात गणेशमूर्ती, पूजा-प्रसाद, पुष्पहार, आरास सजावट विक्र ीची दुकाने थाटली आहेत. तेथे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.