बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 03:35 PM2021-06-02T15:35:15+5:302021-06-02T15:35:38+5:30

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

Preparing to issue onion import license from Bangladesh | बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

googlenewsNext

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी (दि.२) लासलगाव बाजार समिती आवारात बाजारभाव ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रुपये राहिले. तर पिंपळगावी प्रतिक्विंटल २५०० रुपये भाव जाहीर झाला होता. दरम्यान, कांदा भावात हळूहळू तेजी येत असतांनाच आता बांगलादेश सरकारने बुधवार दि.२ जून पासून कांदा आयातीचा परवाना देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कांदा निर्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे.

लासलगांव येथे बुधवारी दिवसभरात १८ हजार ३०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव होऊन ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रूपये बाजारभाव राहिला. मंगळवारी (दि.१) दिवसभरात २५ हजार ९०० क्विंटल उन्हाळ कांदयाचा लिलाव होऊन ६०० ते २१५२ व सरासरी १८०० रूपये भाव राहिला. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार २०५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ६००, कमाल २०२१ तर सर्वसाधारण १५७६रुपये प्रती क्विंटल होते. दरम्यान,
जिल्ह्यातील दिंडोरी व वणी बाजार समितीमध्ये कांद्यांची आवक होत असुन खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाला यंदा कांदा आधार देणार, असे चित्र दिसत आहे. दिंडोरी व वणी बाजार समितीत मे महिन्यात जवळपास ८० हजार ३६७ क्किंटल कांद्याची आवक झाली. तर बाजारभाव साधारणपणे

७७८ ते २१७२ रूपये व सरासरी १४५० रूपये इतके राहिले. यापुढेही कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
------------
पिंपळगावी २५०० रूपये भाव
पिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती आवारातही कांद्याची ९९८ वाहनांतून चांगली आवक होऊन बाजारभाव किमान १००० ते कमाल २५०० रुपये आणि सरासरी १७५१ रुपये राहिले. गोल्टी कांद्याला ४०० ते १५०० रूपये व सरासरी १२०० रुपये भाव मिळाला. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला किमान १९९० व कमाल २१९० तर सरासरी २०८० रुपये भाव मिळाला.
------------------
निर्यातीसाठी अर्ज मागवले
बांगलादेश सरकारने कांदा आयातीकरीता निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. पश्‍चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपुष्टात आल्याने आता नवीन कांद्याची आवक सुरू होईपर्यंत भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉक डाउन असतानाही देशातुन एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याची १४ लाख ०४ हजार मे. टन इतकी निर्यात झाली असून कांदा निर्यातीतून २४३४ कोटी रूपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला कोरोना काळात चांगलेच चलन परकीय मिळाले आहे.

Web Title: Preparing to issue onion import license from Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक