नाशिकरोडला विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:55+5:302020-12-07T04:09:55+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, रिपब्लिकन पार्टी, भारतीय ...
नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, रिपब्लिकन पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, महापालिकेसह विविध संघटना, राजकीय पक्षांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
महापालिकेतर्फे प्रभाग सभापती जयश्री खर्जुल, नगरसेवक जगदिश पवार,
विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर, बांधकाम उपअभियंता निलेश साळी, नितीन
खर्जुल आदींनी अभिवादन केले.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष सनी वाघ, प्रमोद बागुल, संजय भालेराव, सुनिल कांबळे, पवन पवार, भारत निकम, समीर शेख, रामबाबा पठारे, चंद्रकांत भालेराव, राजु वानखेडे, रोहित निरभवणे, बाळासाहेब सोनवणे, संतोष पाटील, विशाल गांगुर्डे, देविदास
दिवेकर, विवेक वाघमारे, अतुल भावसार, संजय पगारे, विलास गांगुर्डे यांनी अभिवादन केले. भारतीय बौध्द महासभेचे रविकांत भालेराव चावदास भालेराव, प्रविण बागुल, अमोल घोडे, शरद भोगे, संतोष धोत्रे, श्रीकांत पगारे, साहेबराव गायकवाड, मोहन बागुल, प्रकाश बागुल, सुहास पवार आदींनी आदरांजली वाहिली.
रिपब्लिकन पार्टीतर्फे अन्नदान
रिपब्लिकन पार्टीतर्फे नाशिकरोडला अन्नदान झाले. जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, उपाध्यक्ष गोटीराम पवार, अमोल पगारे, सनी वाघ, समीर शेख, गोटीराम पवार, महेश सुकेणकर, गुंफा भदरंगे, सुनिल आहिरे, दिनेश जाधव, संतोष पाटील, आकाश भालेराव, बंटी थोरात, राजाभाऊ वानखेडे, अशोक तायडे, सचिन हिरे, विजय सोनवणे, शरद ढवळे, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, बाळा सोनवणे आदी उपस्थित होते.
ड्रीम मिनी मार्केटमध्ये
बाबासाहेबांना आदरांजली
येथील ड्रीम मिनी मार्केट येथे अभिवादन करण्यात आले. मनविसेचे पदाधिकारी शशी चौधरी, नितीन धानापुणे, सनी ओबेरॉय, सागर दाणी, चेतन पाटील, हर्षद लोखंडे, देवेंद्र जाधव, अमोल जगताप, गुड्डू शेख,नंदू वाबळे, सुनील ठाकरे, सुरेश उन्हवणे, जय चव्हाण, विजय खलाटे, गणेश वाघ उपस्थित होते.
फोटो
जनसुराज्य पक्ष
जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पुजन झाले. करोनाच्या प्रार्श्वभूमीवर मास्क वाटप करण्यात आले. आशर इस्टेट सोशल, उपनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष गौतम पगारे, जनसुराज्यचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांच्याहस्ते
प्रतिमा पुजन झाले. अमोल मोरे, हंसराज गायकवाड, अविनाश गायकवाड, जीतू देवरे, एस.पी भालेराव, विवेक चव्हाण, मंगेश खैरनार आदी उपस्थित होते.