निºहाळे फत्तेपूर परिसरात मृगाच्या पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:46 PM2020-06-21T17:46:30+5:302020-06-21T17:48:26+5:30
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे फत्तेपूर परिसरातील पूर्व भागात मृगाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे फत्तेपूर परिसरातील पूर्व भागात मृगाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी, व्यापारी नागरिकांचेही सारे गणितच कोलमडले आहे. तालुक्यात दररोजच पावसाचे वातावरण निर्माण होत होते. रोहिणी नक्षत्र संपले तरी पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर मृगाच्या पावसाची हजेरी लावल्याने पावसाने सुरुवात केली आहे. रात्रभर भीज पाऊस झाल्याने शेती भुसभुशीत होऊन जमिनीत पाणी साचून राहिले आहे.
पाऊस पडता झाल्याने मशागतीच्या कामाला वेग आला आहे. सिन्नर, वावी, नांदूर शिंगोटे आदी बाजार पेठेत खते, बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करू लागले असून, पुन्हा एकदा शिवार मजुरांनी गजबजून गेला आहे.
हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीत व्यस्त झाला आहे. सर्वत्रच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतीच्या कामासाठी मजूरवर्गाची टंचाई भासू लागली आहे, मात्र त्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेतकरी मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कपाशी, भाजीपाला, टोमॅटो आदी लागवडीच्या कामांमध्ये व्यस्त झाला आहे.
पूर्वी शिवारात सर्जा-राजाच्या ललकारीचा घुमणारा आवाज आता लुप्त झाला असून, यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीला प्राधान्य दिले जात असल्याने कमी श्रमात, कमी वेळात मशागत होत असल्याने सध्या सर्वच भागात मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र दिसत आहे.