येवला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:14+5:302021-06-02T04:12:14+5:30

दुष्काळी तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख असून, पर्जन्यमान सरासरी ४८८ मिलीमीटर इतके आहे, अशाही परिस्थितीत येथील शेतकऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा ...

Presence of pre-monsoon rains in Yeola taluka | येवला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

येवला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Next

दुष्काळी तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख असून, पर्जन्यमान सरासरी ४८८ मिलीमीटर इतके आहे, अशाही परिस्थितीत येथील शेतकऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत शेतात नवनवीन प्रयोग करून आधुनिक शेतीची कास धरत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

येवला तालुक्यात खरीप हंगामात मका, सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांबरोबरच बाजरी, भुईमूग, मूग या पिकांचा पेरा जास्त असतो, यावर्षी खरिपासाठी मका चाळीस हजार हेक्टर, कपाशी नऊ हजार हेक्टर, सोयाबीन सात हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. याचबरोबर तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला पिकाकडे वळले असून, टोमॅटो, ढोबळी मिरची, सिमला मिरची, मिरची, वालवड, भोपळे, कारले, दोडके, गिलके तसेच शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी खेळते भांडवल उपलब्ध होत असते, टोमॅटो लागवडीच्या क्षेत्रात तर दरवर्षी वाढ होत आहे. यापासून तीन ते चार महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे कल वाढला आहे, तर खरीप हंगामातील मुख्य व नगदी पीक असलेल्या कांदा लागवडीला प्राधान्य दिले जाते. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कांदा रोपांसाठी उळे टाकले जातात. साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पोळ कांदा लागवड केली जाते.

मागील वर्षापासून जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे शेतकरीवर्ग आणखीनच संकटात सापडला आहे.

लासलगावी पावसाचा जोर

लासलगाव : रोहिणी नक्षत्राच्या पावसाने मंगळवारी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात असलेला उष्मा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ३ वाजेनंतर आकाशात अंधारून आले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. बाळगोपाळांनी पावसाची मजा लुटली. ४ वाजता सुरू झालेला पाऊस ६ वाजले तरी सुरूच होता. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे. दुकाने व लिलावाचे काम दुपारनंतर बंद झाले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिक असल्याने नागरिकांवर आहे त्याठिकाणी थांबून राहायची वेळ आली.

Web Title: Presence of pre-monsoon rains in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.