पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला
By admin | Published: September 9, 2015 09:50 PM2015-09-09T21:50:59+5:302015-09-09T21:54:27+5:30
समाधान : पिंपळगाव, लासलगावसह निफाड तालुक्यात मुसळधार
लासलगाव : बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता लासलगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. शेतकरीवर्गाने वेळेवर महागडी बियाणे आणून ही बियाणे मोठ्या आशेने पेरली. दररोज आकाशाकडे नजरा लावून शेतकरी पावसाच्या सरींची चातकासारखी वाट बघत आहे. परंतु पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जागोजागी पाणी साचलेले दिसून आले. या वर्षी प्रथमच रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.
पावसामुळे बुधवारी पहाटे लासलगाव - कोटमगाव रस्त्यावर मोठा वृक्ष एका दुकानासमोर कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतातील कांदा रोपांना टॅँकर विकतचे पाणी आणून रोपे वाचवत होते. त्यांना थोडाफार सुटकेचा नि:श्वास सोडला. शेतातील सोयाबीन, मका, कांदा यांना दिलासा मिळाला आहे, तर यावेळी खरीप पीक धोक्यात आले.
पाऊस नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिके येणार की नाही याची काळजी निर्माण झाली असताना आॅक्टोबर महिन्याच्या द्राक्षबागा छाटणीचे शेड्युल ठरविता येत नव्हते. पाण्याची समस्या निर्माण झाली तर पीक कसे जगवावे या विवंचनेत शेतकरी होते. परंतु मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने काही प्रमाणात द्राक्ष उत्पादकांनी आॅक्टोबर छाटणीचे नियोजन करीत आहेत.
पूर्वाच्या पावसामुळे रब्बीच्या आशा खामखेडा : सुरवातीच्या कमी पावसामुळे खरिपांची पिके हातातून गेली; परंतु या पावसामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चालूवर्षी सुरुवातीची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने मध्यंतरी झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्याने शेतात खरीप पिकांची पेरणी केली. खरिपाची पिके उगवली; परंतु खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली. पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ झाली नाही आणि दाणा भरण्याच्या आत पिके कोमेजून गेल्याने खरिपाची पिके हाती आली नाही. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यासह पूर्वाच्या पावसाने हजेरी लावल्याने तूर्त लावणीला आलेली कांद्याचे रोपे, लागवड केलेला कांदा आदिंना जीवदान मिळाले आहे. या पावसाने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पूर्वाच्या नंतर हस्ती,उत्तरा , चित्र ,हे महत्वाची पावसाचे नक्षत्र अजुन बाकी आहेत.या नक्षत्राचा पाऊस जोरदार असतो. जर या नक्षत्रामध्ये जर जोरदार पाऊस झाला ,तर नदी ,शिवारातील बांध,नाल्ये पाण्याने तुडुब भरून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिणा पानी उतरते त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात गव्हू,हरभरा रागडा कांदा व त्याच बरोबर महत्वाचा आशे उन्हाळी कांदा चे पिक घेता येईल.या पूर्वाच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.