खेडलेझुंगे परिसरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 00:03 IST2021-06-06T00:02:56+5:302021-06-06T00:03:27+5:30
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद. रुई, परिसरामध्ये परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. भरवस-देवगाव परिसरामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली.

खेडलेझुंगे परिसरात पावसाची हजेरी
ठळक मुद्देभरवस-देवगाव परिसरामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली.
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद. रुई, परिसरामध्ये परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. भरवस-देवगाव परिसरामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली.
गेल्या तीन-चार दिवसापासून हवामानामध्ये होणारा बदल आणि ढग दाटून आले होते. शेतकऱ्यांची पुढील हंगामातील शेत मशागतीची कामे सुरू होती. त्यातच अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवून दिली. सुमारे तीन तास झालेल्या या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते. (०५ खेडलेझुंगे,१)