निफाड तालुक्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:01 PM2020-07-15T21:01:56+5:302020-07-16T00:12:57+5:30
देवगाव : निफाड तालुक्यासह देवगाव परिसरात पावसाने एक तासाहून अधिक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली.
देवगाव : निफाड तालुक्यासह देवगाव परिसरात पावसाने एक तासाहून अधिक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली.
कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. काही शेतकºयांनी हात उसनवारीने तर काहींनी पिकांच्या उत्पन्नातून बियाणाचे पैसे देण्याचा वायदा करून तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवलेल्या पैशातून बियाणाची खरेदी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने महिन्यापासून पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय, या विवंचनेत शेतकºयांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन पावसाने जोरदार हजेरी लावली. ३ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगाव व परिसरात पिकांना मोठा आधार मिळाला. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल.
-----------------
खरीप पिकांना जीवदान
पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, टमाटा या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. काही भागात विहिरींनादेखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.