वणी परिसरात पावसाची हजेरी शेतकरीवर्गात समाधान व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:48 PM2020-08-17T15:48:45+5:302020-08-17T15:49:12+5:30
वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : वणी व परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जिवदान मिळाले असुन शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवासांपासुन पावसाची हजेरी तुरळक लागत होती. त्यामुळे टमाटा, भुईमुग, भात, सोयाबीन व इतर पिकांच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पुरेशा पावसाअभावी होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतामग्न होता. पावासात तितकासा जोर नसल्याने व त्यात सातत्य नसल्याने पिके हातची जातात की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकरीवर्गाची तुर्त चिंता मिटली आहे.
द्राक्ष, टमाटा व ऊस ही पिके प्रामुख्याने घेण्याकडे कल शेतकरीवर्गाचा असायचा पण गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन उत्पादनासाठी अग्रक्र म दिला जातो आहे. सोयाबीन हे साठवणुकीसाठी योग्य असुन वातावरणाचा परिणाम त्यावर होत नाही. तसेच बाजारपेठेच्या आडाख्याचा अभ्यास करु न विक्र ी केली तर आर्थिक गणित जमुन येते असा अनुभव आल्याने उत्पादकांचा कल सोयाबीनकडे आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बारा पाडे व गावामधे भातशेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते, कारण या भागातील जमिन भातशेतीसाठी कसदार व अधिक उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे आदीवासी बांधव भाताचे उत्पादन घेतात. त्याबरोबर टमाटा लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता होती ती गरज गेल्या दोन दिवसांपासुन पुर्ण होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतामुक्त झाला आहे. (फोटो १७ सोयाबीन)