येवला तालुक्यात उत्तर-पूर्व भागात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:55+5:302021-06-11T04:10:55+5:30
तालुक्यातील सावखेडे, अनकाई, कुसुर, अनकुटे, नगरसुल, ममदापूर भारम, अंगुलगाव या गावांसह तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी ...
तालुक्यातील सावखेडे, अनकाई, कुसुर, अनकुटे, नगरसुल, ममदापूर भारम, अंगुलगाव या गावांसह तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाच्या या जोरदार सलामीने बळीराजा सुखावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे पेरणीच्या कामालादेखील आता वेग येणार आहे. पाटोदा, विखरणी, कातरणी, आडगाव रेपाळ, कानडी, कातरणी, विसापूर, ठाणगाव, खैरगव्हाण यांसह काही भागात शेतकऱ्यांनी मका व सोयाबीनची पेरणी केली असून, या पावसाचा या पिकांना फायदा होणार आहे.
तालुक्यातील देवदरी, गवंडगाव, भारम, वाघाळा यांसह अनेक उत्तर पूर्व भागातील गावात शेतात पाणीच पाणी झाले. तर अंगुलगाव गावातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या परिसरातही झालेल्या पेरण्यांना हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.
----------------------
येवला तालुक्यातील भुलेगाव येथील बंधारा पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहताना. (१० येवला १)
===Photopath===
100621\10nsk_17_10062021_13.jpg
===Caption===
१० येवला १