वणीत पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:04 AM2021-07-13T04:04:45+5:302021-07-13T04:04:45+5:30
परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. सोयाबीन, बाजरी, मका व इतर पिकांसाठी पेरणी केली होती. तालुक्याच्या पश्चिम ...
परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. सोयाबीन, बाजरी, मका व इतर पिकांसाठी पेरणी केली होती. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातशेतीचे प्रमाण अधिक असते. भात लावणी व संबंधित भातशेतीच्या कामांना अग्रक्रम देण्यात आला होता. सध्या मजुरांअभावी ही सर्व कामे घरातील कुटुंबीयांचे सदस्य आपल्या परीने करीत होते. या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना वरुणराजा रुसून बसला होता. पावसाच्या कृपावृष्टीसाठी शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला होता. वरुणराजाला साकडे घालत होता. कारण शेती व्यवसायाची कामे वेळेवर करूनही पिके हातची जाण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत होते. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला होता. अशी अवस्था असताना वरुणराजा मनमुराद बरसल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.