जिल्ह्यात  सध्या २ हजार ६५० रुग्णांवर उपचार ; मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 03:26 PM2020-07-28T15:26:23+5:302020-07-28T15:29:42+5:30

नाशिक जिल्ह्यात कोरोना अजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तुलनेत घट झाली असून सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू असून मंगळवार (दि.२८) पर्यंत सुमारे  मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

At present 2 thousand 650 patients are being treated in the district till Tuesday 9 thousand 402 patients are corona free |  जिल्ह्यात  सध्या २ हजार ६५० रुग्णांवर उपचार ; मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त

 जिल्ह्यात  सध्या २ हजार ६५० रुग्णांवर उपचार ; मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्दे१२ हजार ५१९ पैकी ९ हजार  ४०२ रुग्ण कोरोनामुक्त सध्या जिल्ह्यात  २ हजार ६५०  पॉझिटिव्ह रुग्णनाशिक जिल्ह्यात पेठ तालुका कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात कोरोना अजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तुलनेत घट झाली असून सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू असून मंगळवार (दि.२८) पर्यंत सुमारे  मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार ४०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २० ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे. तर आत्तापर्यंत ४६७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात  नाशिक १६९, चांदवड ५३, सिन्नर ११०, दिंडोरी ४७, निफाड १४७, देवळा ४७,  नांदगांव ६६, येवला २६, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा १३, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण १९, इगतपुरी ८२, मालेगांव ग्रामीण ३१ असे एकूण   ८२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९  तर जिल्ह्याबाहेरील ०५  असे एकूण २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १२  हजार ५१९ रुग्ण आढळून आले आहेत. तर नाशिक ग्रामीणमध्ये  १११, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २५३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४६७  रुग्णांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

Web Title: At present 2 thousand 650 patients are being treated in the district till Tuesday 9 thousand 402 patients are corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.