बारा ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:51 AM2017-08-22T00:51:44+5:302017-08-22T00:51:44+5:30
सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या मंगळवारी जाहीर होणार आहेत. बारा ग्रामपंचायतींची मुदत येत्या नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या मंगळवारी जाहीर होणार आहेत. बारा ग्रामपंचायतींची मुदत येत्या नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नोव्हेंबर २०१७ ते फेबुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांची आयोगाने तयारी सुरू केली आहे. गत महिन्यात प्रभागरचना व आरक्षणाची सोडत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयात काढण्यात आली आहे. त्यावर हरकती व सूचना झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभागरचना व आरक्षण जाहीर केले आहे. त्यानंतर राज्य शासनाने निर्णय घेऊन सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींतून प्रथमच थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, ठाणगाव, शहा, वडगाव-पिंगळा, कीर्तांगळी, कारवाडी, सायाळे, उज्जनी, शास्त्रीनगर, कृष्णनगर, आशापूर या बारा ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. मंगळवारी (दि. २२) संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांत प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यावर २८ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना दाखल झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी आक्षेपांचे निरसन करण्यात यावे असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. हरकती व सूचना झाल्यानंतर शुक्र वार, दि. १ सप्टेंबर रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अंंतिम यादी जाहीर झाल्यानंतर दिवाळीपूर्वी किंवा नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर तालुक्यात राजकीय रणधुमाळी पाहण्यास मिळणार आहे. यावेळेस संगणकीय प्रणालीद्वारे मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.