युवास्पंदनमध्ये कलाविष्कारांचे सादरीकरण मविप्र : वाद्यवादन आणि नाट्याने रंगला महोत्सवाचा दुसरा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:27 AM2017-12-30T00:27:20+5:302017-12-30T00:27:32+5:30
नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली.
नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली. सकाळच्या सत्रात शास्त्रीय गायन स्पर्धेत मुलतानी, मौनपुरी, भैरव, बागेश्री, भीमपलासी इ. रागांचे सादरीकरण करण्यात आले. वाद्यवादन स्पर्धेत हार्मोनिअम, क्लोरोनेट, व्हायोलिनच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. तालवाद्य स्पर्धेमध्ये तबला, पखवाज या प्रकारात चौताल, रूपक, तीनताल, सोलोवादन करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून शास्त्रीय गायक प्रा. डॉ. अविराज तायडे, प्रसिद्ध हार्मोनिअमवादक पंडित सुभाष दसककर उपस्थित होते.
वाद्यवादन प्रकारामध्ये क्लोरोनेट, व्हायोलिन हे प्रकार लुप्त होत असताना युवास्पंदन स्पर्धेतील स्पर्धकांनी या प्रकारच्या सादरीकरणातून सर्वांना प्रेरणा दिली. दुपारच्या सत्रात स्कीट, माईममध्ये ‘पाणी वाचवा-देश वाचवा’, ‘शेतकरी आत्महत्या’, ‘स्त्रीभ्रूण हत्या’ , ‘मुलगी वाचवा’, ‘महिला अत्याचार’ आदी ज्वलंत विषयांवर कलाकारांनी आपल्या अभिनयाने मोहर उमटविली. यावेळी १२ स्कीट व ११ माईमचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक सचिन पिंगळे, नाट्य परिषदेचे रवींद्र कदम, अभिनेते संजय भुजबळ, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. मुंगसे, प्रा. तुषार पाटील, डॉ. जगदीश परदेशी, प्रा. योगेशकुमार होले, प्रा. संजय राठोड, प्रा. प्राची इंगळे, प्रा. कांचन बागुल आदी उपस्थित होते. शनिवारी (दि. ३०) एकांकिका व मिमिक्र ींचे सादरीकरण होणार असून, रविवारी (दि. ३१) शास्त्रीय व लोककला नृत्यांनी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर्व प्रकारांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.