‘रफी तेरी याद में’ कार्यक्रमात बहारदार गीतांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:28 AM2019-07-29T00:28:14+5:302019-07-29T00:28:50+5:30
रेवतीश्री प्रॉडक्शनच्या वतीने सदाबहार ‘रफी तेरी याद में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सादर झाला.
नाशिक : रेवतीश्री प्रॉडक्शनच्या वतीने सदाबहार ‘रफी तेरी याद में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सादर झाला.
या कार्यक्रमात रफी यांची विविध सुप्रसिद्ध गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘अकेले है चले जाओ’, ‘आज पुराणी राहोंसे’, ‘याद न आए’, ‘तुम जो मिल गये हो’, ‘रात के हमसफर’, ‘खोया खोया चॉँद’, ‘लिखे जो खत तुझे’, ‘दिवाना हुवा बादल’, ‘जो वादा किया वो’ यांसारख्या सुप्रसिद्ध गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गायक श्रीनिवास सोनवणे व मृणाली मालपाठक यांनी आपल्या आवाजात हे सर्व गीत सादर केले. तसेच कार्यक्रमाचे निवेदक प्रवीण पोतदार यांनी आपल्या अनोख्या शैलीत उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमासाठी नवीन तांबट यांनी तबला, सुहास खरे-ढोलक, तांबट निनाद (की-बोर्ड), महेश कुलकर्णी-गिटार, प्रसाद भालेराव-आॅक्टापॅड यांची साथसंगत लाभली.