पाणी आरक्षणाचा प्रारूप आराखडा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:00 AM2017-11-03T00:00:05+5:302017-11-03T00:00:39+5:30
नाशिक : जिल्ह्णातील मध्यम व मोठ्या धरणांच्या पाण्याचे सिंचन, पिण्यासाठी व उद्योगासाठीच्या वाटप नियोजनाच्या पूर्वतयारी बैठकीत गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून त्यांची मागणी नोंदवून घेतली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया पाणी नियोजन समितीच्या बैठकीत या पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
पुनंद, चणकापूरला वाढीव मागणी : पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दलघफूचे आरक्षण?
नाशिक : जिल्ह्णातील मध्यम व मोठ्या धरणांच्या पाण्याचे सिंचन, पिण्यासाठी व उद्योगासाठीच्या वाटप नियोजनाच्या पूर्वतयारी बैठकीत गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून त्यांची मागणी नोंदवून घेतली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया पाणी नियोजन समितीच्या बैठकीत या पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांच्या दालनात गुरुवारी गोदावरी, कादवा, गिरणा या प्रमुख खोºयातील कार्यकारी अभियंत्यांसह नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पिण्यासाठी व उद्योगासाठीची या वर्षीची मागणी नोंदवून घेतली. तसेच जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रानुसार त्या त्या धरणातील पाण्याची मागणी याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मागील वर्षी १५ आॅक्टोबरला जिल्ह्णातील धरणांमध्ये ९२ टक्के साठा होता. यावर्षी ९१ टक्के साठा आहे. यामुळे मागील वर्षाप्रमाणेच बिगर सिंचनाचे आरक्षण करण्याबाबत चर्चा झाली. यापेक्षा अधिक बिगर सिंचनाची मागणी असेल, तर त्याबाबत पालकमंत्र्यांसमोर तो विषय मांडण्याचा निर्णय झाला. यावेळी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अंतर्गत धरणांमधील पाणी मागणीबाबतचा अहवाल सादर केला. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता चौधरी आदींसह विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
५०० दलघफू आरक्षण
जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या मनेगाव १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (भोजापूर प्रकल्प), देवळा १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (चणकापूर), दाभाडी १२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (चणकापूर/हरणबारी) लासलगाव-विंचूर १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (पालखेड), येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा (पालखेड) आदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे ५०० द.ल.घ.फू पाणी आरक्षण ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
पूनद-चणकापूरला वाढीव मागणी
मागील वर्षी असलेल्या आरक्षणात पूनद व चणकापूर प्रकल्पात यावर्षी जादाचे पाणी आरक्षणाची मागणी आली आहे. या मागणीबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. मग पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत यावर्षीचे पाणी आरक्षण कायम करण्यात येणार असल्याचे समजते.
०२ पीएचएनओ-७९-पाणी आरक्षणासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन. समवेत अन्य अधिकारी. पुनंद, चणकापूरला वाढीव मागणी
मागील वर्षी असलेल्या आरक्षणात पुनंद व चणकापूर प्रकल्पात यावर्षी जादाचे पाणी आरक्षणाची मागणी आली आहे. या मागणीबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. मग पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत यावर्षीचे पाणी आरक्षण कायम करण्यात येणार असल्याचे समजते.