नाशिक महापालिकेत सहाव्यांदा बससेवेचा प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:34 AM2018-09-13T00:34:53+5:302018-09-13T00:35:06+5:30
नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.
नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.
महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्यास देण्याचे प्रस्ताव पाचवेळा मांडण्यात आले होते; मात्र ते फेटाळण्यात आले. आजवरचे प्रस्ताव हे राजकीय पक्षांच्या पुढाकाराने येत होते. मात्र यंदा प्रथमच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव मांडला आहे. त्यामागेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून, गेल्या वर्षी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहर बस वाहतूक ही महापालिकेने चालवण्यासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका अधिनियमात बंधनात्मक नसलेली म्हणजे ऐच्छिक कर्तव्यात दिलेली ही सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या महासभेवर प्रस्ताव सादर केला असून, चारशे बस खासगीकरणातून चालविण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ठेकेदाराला प्रति किलोमीटर खर्च देऊन ही सेवा चालू करण्याचा प्रस्ताव असून, त्यात परिवहन समितीची कोणीतीही तरतूद नाही. विशेष म्हणजे बहुतांशी राजकीय पक्षांचा या सेवेला विरोध आहे. असे असतानाही सेवा महापालिकेनेच सुरू करावी असा सरकारचा अट्टाहास आहे.
१९९५ मध्ये महापौर प्रकाश मते यांच्या कारकिर्दीत ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला होता. परंतु विषय फेटाळला गेला. त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना महामंडळाने प्रस्ताव दिला तेव्हा ही सेवा नाकारण्यात आली. परंतु त्याचबरोबर विनायक पांडे, बाळासाहेब सानप आणि अॅड. यतीन वाघ यांच्या महापौरपदाच्या कालावधीतही प्रस्ताव होते. परंतु ही तोट्यातील सेवा असल्याने नकार देण्यात आला होता. बाळासाहेब सानप महापौर असताना तर शंभर बस खरेदी करण्यासाठी केंद्र शासनदेखील तयार होते. परंतु परिवहन महामंडळाने या बस स्वत:च्या ताब्यात घेतल्या आणि महापालिकेने त्यांना ही सेवा चालविण्याचे स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आत्तापर्यंतच्या फेटाळलेल्या बससेवा
च्महापालिकेने स्वत: बस खरेदी करून सेवा चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला. त्यावेळी याच क्रिसील कंपनीने अहवाल देताना ही सेवा तोट्यात जाईल असे स्पष्ट केले होते.
च्महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्वारस्य घेतलेल्या बीआरटीएस सेवेचा, अहमदाबाद येथील सेवेचा अभ्यास करण्यात आला. मात्र, त्यावेळीदेखील ही सेवा पूर्णत: तोट्यात आढळली होती. शिवाय मोठ्या रस्त्यांवरच बीआरटीएस अन्य रस्त्यावर पूरक साध्या बस किंवा रिक्षांचा वापर होणार होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला होता.
च्आता पुन्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यात ठेकेदारीचा समावेश करण्यात आला आहे; परंतु महापालिकेचा ठेकेदारीविषयी अनुभवदेखील कटू असून, अनेक ठेकेदारांनी खासगीकरणाच्या तरतुदीचा आधार घेऊन लवाद नेमून स्वत:च्या सोयीचे निकाल लावले तसेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा घाटादेखील झाला आहे.