परिरक्षण भूमापकास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 01:02 AM2021-01-01T01:02:56+5:302021-01-01T01:03:21+5:30
नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परिरक्षण भूमापक संदीप हरीलाल चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीस हजार रुपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.३१) रंगेहात अटक केले आहे.
नाशिक : नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परिरक्षण भूमापक संदीप हरीलाल चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीस हजार रुपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.३१) रंगेहात अटक केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडीलांचे नांवे खरेदी केलेल्या घरांवर तक्रारदार यांचे वडीलांचे नांव लावण्यासाठी परिरक्षण भूमापक संदीप चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडून ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी
करुन सापळा रचला.
यावेळी संदीप चव्हाण, यांनी तक्राररदार यांचेकडून पंचासमक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केली, आणि तडजोडी अंती ४०हजार
रुपये लाचेची मागणी करुन
त्यापैकी ३० हजार रुपये लाचेची रककम नगर भूमापन नाशिक कार्यालयात गुरुवारी ( दि.३१) स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.