राष्ट्रपतींनी निमंत्रण स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:06 AM2018-10-09T00:06:35+5:302018-10-09T00:08:13+5:30
सटाणा : जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले असून, येत्या २२ आॅक्टोबरला या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
सटाणा : जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले असून, येत्या २२ आॅक्टोबरला या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी कोविंद यांनी मांगीतुंगीविषयी सखोल माहिती जाणून घेतली. मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते २२ तारखेला या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे
आदी मंत्रिगण उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहायक पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी मांगीतुंगीला भेट देऊन पाहणी केली.
याबाबतचा अहवाल तत्काळ गृह खात्याला पाठविण्यात आला. प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल भुसारे, सहायक अभियंता दिलीप घाडगे यांनी शासकीय विश्रामगृह, रस्ते दुरुस्ती याबाबत पाहणी करून आढावा घेतला. रस्ते व विश्रामगृह दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मूर्ती निर्माण समितीने घेतली भेटसंरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, अनिल जैन, महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल, विजय जैन यांनी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली.