राष्ट्रपती कोविंदना दुष्काळाची चिंता, उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 06:26 AM2018-10-23T06:26:46+5:302018-10-23T06:26:58+5:30

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून, योग्य उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी विश्वशांती अहिंसा संमेलनात केली.

President Kovindan asks Chief Minister to take care of drought | राष्ट्रपती कोविंदना दुष्काळाची चिंता, उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांना सूचना

राष्ट्रपती कोविंदना दुष्काळाची चिंता, उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांना सूचना

Next

मांगीतुंगी (जि. नाशिक) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून, योग्य उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी विश्वशांती अहिंसा संमेलनात केली. राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असून, त्यावर उपाययोजना व लोकांच्या मदतीसाठी लवकरच आदेश काढू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंचीच्या विश्वविक्रमी मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. या वेळी रामनाथ कोविंद म्हणाले की, आपण कझाकीस्तानच्या दौऱ्यावर असताना, तेथेही दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे महाराष्टÑातील दुष्काळाबाबत आपण चिंतित आहोत. राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

Web Title: President Kovindan asks Chief Minister to take care of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.