राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केले आमंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:52 PM2018-10-06T17:52:15+5:302018-10-06T17:57:56+5:30
सटाणा/औंदाणे : श्री क्षेत्र मांगीतुंगी (ऋषभदेवपुरम्) (ता.बागलाण) येथे सोमवार (दि.२२) पासून सुरु होणाऱ्या जागतिक अहिंसा ‘विश्वशांती अहिंसा संमेलन’ महोस्तव धार्मिक कार्यक्र म निमित्त भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आले असून वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रपती मांगीतुंगीला येणार असल्याची माहिती १०८ फुट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी अध्यक्ष, पिठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली.

ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपती मांगीतुंगी येथे येणार असल्याचे निश्चित झाले असून जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक ज्ञानमती माता, चंदनामती माताजी, कर्मयोगी रवींद्र कीर्ती स्वामी, कार्याध्यक्ष अनिल जैन, मुख्य अधिष्ठाता सी. आर. पाटील, महामंत्री संजय पापडीवाल, डॉ. जीवन प्रकाश जैन, विजयकुमार जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गणेश गुरव यांनी ऋषभदेवपुरम येथे बैठक घेऊन सुरक्षा, मंडप, स्टेज, वाहनतळ, प्रमुख अतिथी, अधिकारी, संत, लोकप्रतिनिधी, भाविक यांची बैठक व्यवस्था, हेलीपॅड, मांगीतुंगी तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते, मैदान, वीज, दूरध्वनी, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी मुख्य विषयांबाबत चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी केली.
अप्पर पोलीस अधीक्षक निलोपल, बागलाण तहसीलदार प्रमोद हिले, वनपरीक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे यांनीही कार्यक्र म नियोजानाबत माहिती घेऊन संबंधित सुरक्षा विभाग, ट्रस्ट विभागाला कार्यक्र म सुरळीत पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या. या कार्यक्र मानिमित्त भारत व भारताबाहेरील जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी यांनी मांगीतुंगी तीर्थक्षेत्र व भारतातील संलग्न जैन तीर्थक्षेत्र संबंधित उपस्थित अधिकारी यांना ऐतिहासिक पुस्तके भेट देऊन आशीर्वाद दिला. यावेळी ट्रस्ट कमिटीचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते.