सभापतिपदाचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:52 PM2020-03-04T23:52:56+5:302020-03-04T23:55:08+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (दि.५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भाजप आणि सेनेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. किमान संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने नाराज सदस्यांची समजूत काढली असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: अहमदाबाद येथे सर्वांशी चर्चा केली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी भाजपचाच सभापती होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (दि.५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भाजप आणि सेनेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. किमान संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने नाराज सदस्यांची समजूत काढली असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: अहमदाबाद येथे सर्वांशी चर्चा केली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी भाजपचाच सभापती होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.६) होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (दि.३) मनसेचे अशोक मुर्तडक यांनी अर्ज नेला होता. बुधवारी (दि.४) भाजपचे गणेश गिते आणि राष्टÑवादीच्या शाहीन मिर्झा यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. गुरुवारी (दि.५) दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज वितरित होणार असून, त्यानंतर दुपारी १ पर्यंत अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यामुळे उमेदवार विशेषत: संभाव्य उमेदवारांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपने सभापतिपदासाठी कंबर कसली आहे. अहमदाबाद येथे पक्षाचे सदस्य आहेत. त्याठिकाणी तीन आणि सहा असे दोन गट पडले. तसेच अन्य इच्छुकांशी चर्चा न करता परस्पर गणेश गिते यांचे नाव निश्चित केल्याचा आरोप संबंधितांनी केला होता. पक्षाच्या अन्य कोणत्याही प्रदेश नेत्याशी बोलू दिले जात नाही त्याचप्रमाणे विश्वासात घेतले जात नाही, असा या सदस्यांचा आक्षेप आहे. शुक्रवारी होणारी निवडणूक गोपनीय पद्धतीने मतपत्रिकांच्या आधारे घेतली जाणार असून निकाल मात्र घोषित केला जाणार नाही. मतपत्रिका न्यायालयात सादर केल्या जाणार असून त्यावर ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे गोपनीय मतदानात भाजपलाही नाराजांची धास्ती आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे नेते आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (दि.४) अहमदाबाद गाठले. त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांशी चर्चा केली. यावेळी गणेश गिते, प्रा. शरद मोरे, वर्षा भालेराव आणि स्वाती भामरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातील संभाव्य उमेदवार आता गुरुवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, आता नाराजांची नाराजी दूर झाली सभापती भाजपचाच होईल, असा विश्वास महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.हालचाली : फडणवीस यांच्याशी होणार चर्चामहापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी अहमदाबाद येथून मुंबई गाठले. तेथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मगच उमेदवार घोषित केला जाणार आहे.
विरोधकांकडून अनेकांनी अर्ज नेले असले तरी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहेत. निवडणूक लढविण्यासाठी ते सत्तारूढ भाजपला टक्कर देऊ शकतील असे सांगितले जात असून त्याच दृष्टीने त्यांचे नाव चर्चेत आहेत. अर्थात, शिवसेनेकडून कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर यांचीही नावे चर्चेत आहेत. याशिवाय मनसेचे अशोक मुर्तडक यांच्यासह अन्य विरोधी पक्षांची भूमिकादेखील महत्त्वाची आहेत.