नाशिकच्या पाच पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:26 AM2020-01-26T00:26:27+5:302020-01-26T00:26:58+5:30
उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक यावर्षी नाशिकच्या पाच पोलिसांना जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (दि.२५) राज्यातील ५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. त्यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन, जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामधील एक, तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा या पुरस्कार्थींमध्ये समावेश आहे.
नाशिक : उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक यावर्षी नाशिकच्या पाच पोलिसांना जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (दि.२५) राज्यातील ५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. त्यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन, जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामधील एक, तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा या पुरस्कार्थींमध्ये समावेश आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्ता-लयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक मेहबूबअली जियाद्दीन सय्यद आणि सातपूर पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस हवालदार संजय राजाराम वायचळे यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील दहशतवाद विरोधी पथकातील विष्णू गोसावी यांचा पोलीस पदकाने सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नाशिक युनिटचे अधिकारी बाबूराव दौलत बिºहाडे व सूर्यकांत धर्मा फोकणे यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. यातील बिºहाडे हे १९८५ मध्ये मालेगाव मध्ये रूजु झाले. नाशिक शहरात भद्रकाली, पंचवटी याठिकाणी काम केले होते कुंभमेळ्यातील कामगिरीमुळे देखील त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. फोकणे यांची पंचवीस वर्षे सेवा झाली असून त्यांनी देखील उत्तम कामगिरी बजावली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल आदी पदकांची घोषणा केली. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ट सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहीर करण्यात आले. त्यात देशातील एक हजार ४० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे.