मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई सुभाष तायडे यांना राष्ट्रपती सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:12 PM2019-01-23T22:12:50+5:302019-01-23T22:13:28+5:30

नाशिक : येथील औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई सुभाष तोताराम तायडे यांना कारागृहातील कैद्यांच्या मानिसक व व्यवहारी जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल राष्ट्रपती सेवा पदक प्राप्त झाले आहे.

Presidential Service Medal of the Central Jail Shipping Subhash Taeyde | मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई सुभाष तायडे यांना राष्ट्रपती सेवा पदक

पुणे येथील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते राष्ट्रपती सेवा पदक स्वीकारताना सुभाष तायडे.

Next
ठळक मुद्देकैद्यांच्या मानसिक, व्यवहारी जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणला

नाशिक : येथील औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई सुभाष तोताराम तायडे यांना कारागृहातील कैद्यांच्या मानिसक व व्यवहारी जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल राष्ट्रपती सेवा पदक प्राप्त झाले आहे.
तायडे हे औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई आहेत. पुणे येथील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. येरवडा येथील दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाच्या कारागृह शिपाई प्रशिक्षणार्थींच्या तुकडी क्र . ११२ च्या दीक्षांत संचलन कार्यक्र मात प्रदान करण्यात आला. यावर्षी महाराष्ट्रातील ७ शिपाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तायडे यांची या परितोषिकासाठी निवड झाली होती.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. खटावकर उपस्थित होते. त्या अगोदर तायडे यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आदर्श कर्मचारी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या २७ वर्षाच्या सेवेत त्यांनी अहमदनगर, नाशिक, पैठण या ठिकाणी सेवा केली आहे.
माणूस म्हणून कसे जगावे याचे धडे त्यांनी कैद्यांना दिले आहेत. शिक्षा संपल्यावर कैद्यांच्या जीवनाचे पुनर्वसन करण्यासाठी तायडे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
 

Web Title: Presidential Service Medal of the Central Jail Shipping Subhash Taeyde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस