नाशिक पोलीस आयुक्तालयातील भवर यांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:53 AM2018-08-15T00:53:14+5:302018-08-15T00:54:08+5:30

पोलीस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि़१४) जाहीर करण्यात आले़ त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले

 President's Medal of the Nashik Police Commissioner Bhavar | नाशिक पोलीस आयुक्तालयातील भवर यांना राष्ट्रपती पदक

नाशिक पोलीस आयुक्तालयातील भवर यांना राष्ट्रपती पदक

Next

नाशिक : पोलीस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि़१४) जाहीर करण्यात आले़ त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील तीन व राज्य गुप्तवार्ता विभाग नाशिक कार्यालयातील एकास प्रशंसनीय कामगिरीबाबत ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे़  पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी वा कर्मचा-यांना स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च अशा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाते़ राज्यातील अशा अधिकारी, कर्मचाºयांच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले़ १९७८ मध्ये पोलीस दलात भरती झालेल्या भवर यांची ४० वर्ष सेवा झाली आहे़ २००३ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, २००५ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक मिळाले आहे़ भवर यांना चाळीस वर्षातील सेवेमध्ये ५५६ बक्षिसे मिळाली आहेत़  तर पोलीस दलातील प्रशंसनीय कामगिरीबाबतचे ‘पोलीस पदक’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले, शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण संपत अहिरे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाना जाधव, परिमंडळ दोनचे चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ खान दौडखान पठाण तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नाशिक कार्यालयातील नंदकुमार सुरेशप्रसाद मिसर यांना जाहीर झाले आहे़

Web Title:  President's Medal of the Nashik Police Commissioner Bhavar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.