कामगार कायद्याच्या निषेधार्थ प्रेस कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:14 AM2020-07-04T00:14:46+5:302020-07-04T00:48:58+5:30
कामगार कायद्यातील बदल तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरु द्ध नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील कामगारांनी शुक्र वारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या वेळेत निदर्शने केली.
नाशिकरोड : कामगार कायद्यातील बदल तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरु द्ध नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील कामगारांनी शुक्र वारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या वेळेत निदर्शने केली.
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध करून शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विविध कामगार संघटनांनी ३ जुलैला देशव्यापी संप पुकारला आहे. त्याला समर्थन देताना नाशिकरोड मुद्रणालयाच्या मजदूर संघाने युनियन कार्यालयासमोर निदर्शन केली.
निदर्शने आंदोलनामध्ये प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष सुनील आहिरे, हिंद मजदूर सभेचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, सुनील अहिरे, उत्तम रकिबे, कार्तिक डांगे, संदीप व्यवहारे आदी सहभागी झाले होते.
अविनाश देवरु खकर, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, रमेश खुळे, चंद्रकांत हिंगमिरे, इरफान शेख, नितीन आहेर आदी सहभागी झाले होते.