पोलिसांवर दबाव, भाजपावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:28+5:302021-08-25T04:20:28+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावरून भाजप-सेनेत संघर्ष उफाळून आला असून, मंगळवारी (दि.२४) भाजप कार्यालयावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावरून भाजप-सेनेत संघर्ष उफाळून आला असून, मंगळवारी (दि.२४) भाजप कार्यालयावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजप कार्यालयात जमले हेाते. या प्रकारानंतर पोलीस आयुक्तांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी फरांदे आणि माजी शहराध्यक्ष विजय साने यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी यापूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेकदा अपशब्द काढण्यात आले. मात्र, भाजप कायकर्त्यांनी संयम बाळगला. मात्र, यापुढे संबंधितांना योग्य तो धडा शिकवला जाईल, असे सांगितले. यावेळी आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर सतीश कुलकर्णी, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, प्रदीप पेशकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.