राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:26 AM2018-05-18T00:26:11+5:302018-05-18T00:26:11+5:30

नाशिक : विधान परिषदेचा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, पक्षाचे नेते अजित पवार यांनी या जागेसाठी नाशिकला दोन दिवस मुक्काम ठोकल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचा दावा केला जात आहे. कॉँग्रेससह मित्रपक्षांचा पाठिंबा मिळविण्यात राष्टÑवादीला यश आले असून, छगन भुजबळ यांनीही आपल्या दूतांकरवी निरोप पाठविल्यामुळे विरोधी पक्षातील अनेक सदस्य संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

The prestige of Congress-NCP-Congress Congress is to emerge | राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

राष्टÑवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

Next
ठळक मुद्देविधान परिषद : पवार, भुजबळांकडे सूत्रे; विरोधी गट संपर्कात असल्याचा दावासर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी व पक्षप्रमुखांशी वैयक्तिक संपर्क साधून मदतीची विनंती

नाशिक : विधान परिषदेचा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, पक्षाचे नेते अजित पवार यांनी या जागेसाठी नाशिकला दोन दिवस मुक्काम ठोकल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचा दावा केला जात आहे. कॉँग्रेससह मित्रपक्षांचा पाठिंबा मिळविण्यात राष्टÑवादीला यश आले असून, छगन भुजबळ यांनीही आपल्या दूतांकरवी निरोप पाठविल्यामुळे विरोधी पक्षातील अनेक सदस्य संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असून, सहा वर्षांपूर्वी पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक असतानाही निव्वळ छगन भुजबळ यांना विरोध म्हणून शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळून निवडणूक काट्याची झाली होती.
राज्याचे नेतृत्व करीत असताना नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी त्यांचा संपर्क आलेला असल्यामुळे पवार यांना नकार देण्याचे धाडस कोणी केले नसल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात किती मदत होईल याविषयी अजूनही साशंकता आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा कायम ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांच्या दृष्टीनेही विधान परिषदेची निवडणूक तितकीच महत्त्वाची असून, तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी या निवडणुकीचे सारे आडाखे जाणून घेतल्यानंतर आपल्या दूतांकरवी समर्थकांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकीत अपक्ष मतदारांची संख्या लक्षणीय असल्यामुळे त्यांना गळाला लावण्यासाठीही राजकीय प्रयत्न केले जात असून, विशेष करून मालेगाव महापालिकेतील तिसरा महाज, जनता दल, कॉँग्रेसच्या मुस्लीम नगरसेवकांवर प्रामुख्याने या निवडणुकीचे गणित असल्यामुळे मालेगावचे आमदार आसिफ शेख, महापौर रशीद शेख व माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या असून, भाजपा व शिवसेनेच्या नाराजांवर लक्ष केंद्रित करून विजयाचे गणित आखले जात आहे. यंदाच्या निवडणुकीत एकट्या राष्टÑवादीचे संख्याबळ जेमतेम शंभर इतके असून, त्याखालोखाल कॉँग्रेसची संख्या आहे. संख्याबळात तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्टÑवादीने गतवेळचे प्रतिस्पर्धी शिवाजी सहाणे यांना उमेदवारी देऊन मतदारसंघ राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. कॉँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने राष्टÑवादीला पाठिंबा दिला असताना तरीही संख्याबळाचे गणित गाठण्याच्या दृष्टीने अजित पवार यांनी नाशकात दोन दिवस मुक्काम ठोकून सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी व पक्षप्रमुखांशी वैयक्तिक संपर्क साधून मदतीची विनंती केली आहे.

Web Title: The prestige of Congress-NCP-Congress Congress is to emerge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.