प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ पुरस्कार स्थगित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:26 AM2021-03-04T04:26:21+5:302021-03-04T04:26:21+5:30
नाशिक : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी आयोजित केला जाणारा यंदाचा ...
नाशिक : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी आयोजित केला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार समारंभ स्थगित केला आहे.
या पुरस्कार समारंभाचे आयोजन बुधवार,१० मार्च रोजी सायं. ६.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार म्हणजे, साहित्यक्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे साहित्य जीवन समृद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या साहित्यक्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला होता. मात्र, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून परिस्थितीनुरुप त्याबाबत भविष्यात निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.