जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 01:35 AM2021-03-17T01:35:26+5:302021-03-17T01:35:48+5:30

पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात खैराची अवैध वाहतूक रोखली. तोडलेल्या लाकूडसाठ्यासह गुजरातची तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

Prevented illegal transportation of Khaira in the border areas of the districts | जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली

जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली

Next
ठळक मुद्देउंबरठाण वनपरिक्षेत्र : पांगारणे शिवारात गुजरातची तीन वाहने ताब्यात

नाशिक : पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात खैराची अवैध वाहतूक रोखली. तोडलेल्या लाकूडसाठ्यासह गुजरातची तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच्या सीमेला लागून आहे. यामुळे सातत्याने दऱ्याखोऱ्यातील चोरट्या वाटेने तस्कर टोळ्या घुसखोरी करतात. काही दिवसांपूर्वीच नाशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुजरात वनविभागाच्या सापुतारा, डांग, कपराडा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांसोबत ‘बॉर्डर मीटिंग’ घेत जंगलतोड करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी एकमेकांना संयुक्तरीत्या मदत करत ‘ॲक्शन प्लॅन’ राबिवण्याचा निर्धार केला. या बैठकीला आठवडा होत नाही, तोच उंबरठाण वनपरिक्षेत्रात तस्करांनी घुसखोरी करत खैराच्या झाडांवर घाव घातला. तोडलेला खैर गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा मनसुबा वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व त्यांच्या पथकाने उधळून लावला. 
चोखपणे रात्रीची गस्त घालत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून शिताफीने अवैधरीत्या खैर वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनांना ‘ब्रेक’ लावला. पथकाने मौजे पांगारणे शिवारात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या भरधाव जाणारी मॅक्स जीप (जीजे ०६ बीए६१३८), दोन क्वालिस कार (जीजे२१ ५९६४) व (जीजे१९ ए ४४१४) राेखल्या. 
या वाहनांमधून सहा हजार ८६२ रुपये किमतीचे  खैराचे एकूण १७ नग जप्त करण्यात आले. तसेच तीनही वाहनांसह सुमारे २ लाख ७६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने या कारवाईत जप्त केला आहे.
अंधारात केला पोबारा
वनविभागाच्या पथकाने लावलेला सापळा लक्षात आल्यानंतर संशयित तस्करांनी वाहने भरधाव दामटवित हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात तीनही वाहने बेवारस सोडून वाहनचालकांसह त्यांच्या इतर साथीदारांनी वनविभागाच्या पाठलाग करणाऱ्या गस्ती पथकाची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. दरम्यान, सीमावर्ती गुजरात वनविभागाच्या तपासणी नाक्यांनाही याबाबत ॲलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Prevented illegal transportation of Khaira in the border areas of the districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.