अंतापूर ग्रामपंचायतीतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 07:14 PM2020-04-24T19:14:11+5:302020-04-24T19:14:40+5:30
मालेगांव येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अंतापूर ग्रामपंचायतीने गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप खैरनार यांनी दिली.
ताहाराबाद : मालेगांव येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अंतापूर ग्रामपंचायतीने गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप खैरनार यांनी दिली.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य,आशा,अंगणवाडी कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. प्रारंभी गावात करण्यात आलेल्या सर्व्हेचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला व्हव्यात यावर चर्चा करण्यात आली. सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन गावातील सर्व कुटुंबासाठी सॅनिटायझर, साबण, मास्क वाटप करण्याचा उपक्र म हाती घेण्यात आला.या उपक्र मासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील गवळी यांनी एक हजार मास्क व ग्रामपंचायत सदस्य अमित पवार यांनी पाचशे मास्क स्वखर्चाने वाटपासाठी ग्रामपंचायतीकडे दिले. ग्रामस्थांसोबत ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य,अंगणवाडी, आशा सेविका यांना मास्क,सॅनिटायझर, साबण देण्यात आले. आहे. तसेच ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावाच्या सर्व वेशी बंद केल्या आहेत. गावात बाहेरु न येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ग्रामपंचायत लक्ष ठेऊन आहे. गावात तीन वेळा जंतुनाशक फवारणी करण्यात आली. सरपंच मीनाबाई बोरसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा गवळी,अमित पवार,सुरेश गवळी,कारभारी सोनवणे, रत्नाबाई पानपाटील, मंदाबाई रायते, रंजना भोये,ज्योती बागुल, महारु बाई पवार, दौलत गायकवाड, कस्तूराबाई गवळी, सुरेखा गवळी,दावल भवरे,पोलिसपाटील सुमनबाई खैरनार आदी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी परिश्रम घषत आहेत.