वणी ग्रामपालिकेतर्फे प्रतिबंधक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:07 PM2020-03-31T17:07:34+5:302020-03-31T17:08:08+5:30
कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपालिकेकडून शहराच्या विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.
वणी : कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपालिकेकडून शहराच्या विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.
शहराची संख्या सुमारे पंचवीस हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात नवनवीन वसाहती तसेच रो हाऊसेस व अपार्टमेंट यांची भर पडल्याने लोकसंख्येत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग होत असल्याने शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वणी ग्रामपालिकेकडून देखील आपल्या परिने उपाययोजना राबविल्या जात आहेत. परिसर स्वच्छतेसाठी घंटागाडीचा उपक्र म यशस्वीपणे सुरु आहे . मात्र सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या मागणीनुसार ग्रामपालिकेने शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. टप्याटप्याने ग्रामपालिका कार्यक्षेत्रात फवारणी केली जाणार आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा घंटागाडीतच टाकावा व संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी करु नये तसेच लॉकडाऊन काळात घराबाहेर पडू नये असे आवाहनन सरपंच सुनिता भरसठ, उपसरपंच मनोज शर्मा, ग्रामपंचायत सदस्य विलास कड, देवेंद्र गांगुर्डे व ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांनी केले आहे.