आधी लगीन नगरपालिकांचे नंतर पदवीधरचे

By Admin | Published: November 17, 2016 10:13 PM2016-11-17T22:13:00+5:302016-11-17T22:12:35+5:30

पदवीधर निवडणूक हालचाली : २७ नोव्हेंबरनंतर येणार वेग

Previously the post graduate of municipal council | आधी लगीन नगरपालिकांचे नंतर पदवीधरचे

आधी लगीन नगरपालिकांचे नंतर पदवीधरचे

googlenewsNext

नाशिक : आधीच पुढे ढकलल्या गेलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला आता नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे ब्रेक लागल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचे नंतर रायबाचे’ या उक्तीनुसार आधी नगरपालिका निवडणुका मगच पदवीधरच्या निवडणुका असा मानस ठरविला आहे.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वीच भाजपाने उमेदवार जाहीर करून पदवीधर निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर कुरघोडी केली होती. अर्थात कॉँग्रेसनेही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर करून आपले इरादे स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात दिवाळीपूर्वीच कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईला बैठका होऊनही आघाडीबाबत निर्णय होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात संबंधित उमेदवारांनी दिवाळीमध्ये शुभेच्छा व भेटवस्तू देत मतदारांना सूचक आवाहनही केले होते. मात्र २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी पदवीधर ऐवजी नगरपालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पदवीधरच्या उमेदवारांन वैयक्तिक पातळीवर प्रचाराची मुभाही दिल्याचे समजते. नाशिक पदवीधर मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खूपच मोठा असल्याने उमेदवारांना आयताच प्रचारासाठी वेळ मिळाला आहे. दिवाळीच्या काळात उमेदवारांनी पाचही जिल्ह्यांत फिरून पहिला राऊंड पूर्ण केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Previously the post graduate of municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.