रासायनिक खतांपाठोपाठ शेणखताला सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:50+5:302021-05-18T04:14:50+5:30
पाटोदा : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरीवर्गाचे आर्थिक गणित कोलमडून पडले असतानाच आता ...
पाटोदा : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरीवर्गाचे आर्थिक गणित कोलमडून पडले असतानाच आता पशुधनाच्या शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे. शेण खताच्या एका ट्रॅक्टर ट्रालीसाठी सात ते साडेसात हजार रुपये मोजावे लागत आहे. शेळ्या व मेंढ्यांच्या खताच्या ट्रालीसाठी सहा ते साडेसहा हजार रुपये मोजावे लागत असून, भाववाढीमुळे शेणखत टाकणेही अवघड झाले आहे.
आधीच कोरोना महामारीमुळे कडक लॉकडाऊन पुकारण्यात आले असून, सर्व बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतातील विक्रीसाठी तयार विक्रीअभावी शेतात तसाच पडून असल्याने खरीप हंगामासाठी भांडवल कसे उपलब्ध करावे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करून झटका दिल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतात रासायनिक खतांचा अतिवापर वाढल्याने व एकच पीक वारंवार घेतल्याने जमिनीची पोत घसरत चालल्याने शेतकरी शेतीची पोत सुधारावी म्हणून पशुधनाचे शेणखताकडे शेतकरी वळले असून, शेतात शेणखत टाकत आहे. परंतु सध्या पशुधनाची संख्याही कमी झाल्याने शेणखत मिळणे अवघड झाले आहे. शेणखताला मागणी वाढल्याने दरही वाढत असून, त्याचे भाव गगनाला भिडले असल्याने शेणखत टाकणे अडचणीचे ठरत आहे. सध्या शेतकरीवर्गाचे खरीपपूर्व कामांची लगबग सुरू असून, जमिनीची नांगरणी करणे, जमीन सपाट करणे, जमिनीतील ढेकळ फोडून जमीन भूसभुसित करणे, तसेच जमिनीतील गवताच्या काड्या व काशा वेचणे ही कामे अंतिम स्थितीत आली आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या अगोदर ट्रक्टरच्या मदतीने शेतात शेणखत नेऊन टाकणे व ते शेतात पसरविण्याच्या कामांनी वेग घेतला आहे.
………………………………
जमिनीतून शेनखत, गाडूळखत, जिवाणू वापरून आपल्या मातीचे आरोग्य चांगले ठेवू शकतो आणि ही आता काळाची गरज आहे. आज जगभरातून सेंद्रिय मालाची वाढती मागणी याविषयीचे महत्त्व दिसत आहे, त्यातच आता ही रासायनिक खताची औषधाची भाववाड यातून शेतकऱ्यांना जैविक शेती शिवाय पर्याय नाही.
-विठ्ठल वाळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक (१७ पाटोदा)
===Photopath===
170521\17nsk_8_17052021_13.jpg
===Caption===
१७ पाटोदा