साखरेपेक्षा गुळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:20+5:302021-06-27T04:11:20+5:30
चौकट- गुळाचा चहा बनले स्टेटस पुर्विच्या काळात अनेक घरांमध्ये गुळाचेच पदार्थ अधिक बनविले जायचे अगदी दिवाळीचा फराळही गुळापासूनच होत ...
चौकट-
गुळाचा चहा बनले स्टेटस
पुर्विच्या काळात अनेक घरांमध्ये गुळाचेच पदार्थ अधिक बनविले जायचे अगदी दिवाळीचा फराळही गुळापासूनच होत होता त्यात पौष्टीकता अधिक होती. लग्नसमारंभ, साखरपुडा, दशक्रीया विधी आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेक गरीब लोक गुळाच्या लापशीलाच अधिक प्राधान्य देत असत. इतकेच नव्हे ते अनेक जु्न्या पहिलवानांचे गुळ आणि शेंगदाने हे प्रमुख खाद्य होते. इतकेच काय सकाळी सकाळी कामाला निघणारे कामगारही खिशात गुळ आणि शेंगदाणे घवुन घराबाहेर पडत असत. कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तेवढे शेंगदाणे आणि गुळ संपवित असत. गुळाचा चहा दररोज व्हायचा. सणावाराला गुळाचे गुळवणी मंडळी पुरणपोळी कुस्करुन खात असत. साखर आल्यानंतर मात्र ती मजा गेली. गुळाची जागा साखरेने घेतली अन गुळाच्या लापशीची जागा साखर शीऱ्याने घेतली. आता पुन्हा दिवस पालटले आहेत. अनेक नागरीक आरोग्यबाबत विशेष जागरुक झाले असून गुळाच्या चहालाच अधिक पसंती देउ लागले आहेत. अनेक ठिकाणी तर गुळाच्या चहाची हॉटेल्स सुरु झाली आहेत.
कोट-
प्रकृतीसाठी गुळ चांगला
साखर तयार करताना खुप प्रक्रीया केल्या जातात त्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रीया होत असल्याने गुळात मिनरल्स, खनीज लोह हे पदार्थ टिकुण राहातात गुळातुन आपल्याला काही प्रमाणात आयर्नही मुळत असते त्यामुळे आरोग्यासाठी गुळ चांगला आहे. भारतीय संस्कृतीतही गुळाला महत्व आहे. पुर्वी कुणीही घरी आले तर त्यांना प्रथम गुळाचा खडा आणि पाणी देत असत ही आपली परंपरा आहे. - मीनल बाकरे- शिंपी, आहारतज्ज्ञ
शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी
कोट-
अनेक लोक आता गुळाच्या चहाकडे वळाले आहेत. ऑरगॅनीक टी, ग्रीन टी यांनाही पसंती मिळु लागली आहे. सध्या लाेणचे बनविण्यासाठीही गुळाचा वापर होत असल्याने गुळाला चांगली मागणी वाढली आहे. कोरोनाच्या काळात तर नागरीकांनी गुळाचे विशेष महत्व पटले असल्याचे दिसुन येते. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
गावात मात्र साखरच !
कोट-
गुळापेक्षा साखर स्वस्त असल्याने ग्रामीण भागात गुळापेक्षा साखरेलाच अधिक पसंती दिली जाते. सध्या तर गुळ आणि साखरेच्या दरात सुमारे १५ रुपयांचा फरक आहे. सर्वसामान्य गोरगरीबांना ते परवडण्यासारखे असल्याने या भागात साखरेची अधिक विक्री होत असते. - विजय श्रीमाळी, किराणा व्यापारी