विंचूर उपबाजारात कांद्याला साडेपाच हजाराचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:10 IST2020-10-29T19:09:50+5:302020-10-29T19:10:22+5:30
विंचूर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करण्याबाबतचा तिढा अजून कायम असला तरी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू आहे.

विंचूर उपबाजारात कांद्याला साडेपाच हजाराचा भाव
ठळक मुद्देबुधवारी 500 क्विंटल आवक झाली.
विंचूर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करण्याबाबतचा तिढा अजून कायम असला तरी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहे. विंचूर उपबाजार आवारात आज कांद्याला साडेपाच हजार भाव मिळाला. सकाळी कमीत कमी दोन हजार, सरासरी चार हजार आठशे , तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये भाव होता. काल बुधवारी 500 क्विंटल आवक झाली.
कमीत कमी 1975, जास्तीत जास्त 5501 तर सरासरी चार हजार आठशे रुपये भाव होता.