भाव स्थिरावणार, कांदा निर्यात मूल्य झाले शून्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 08:02 PM2018-02-02T20:02:01+5:302018-02-02T20:02:29+5:30

कांदा  बाजार भाव वेगाने कोसळत  असल्याचे पाहुन शुक्रवारी  सायंकाळी  केंद्र  सरकारने  अधिसूचना क्रमांक  48 /2 017 जारी करून कांदा  किमान  निर्यात  मुल्य 700 डाॅलर प्रतिटन  हे कमी करून पुढील  आदेश येईपर्यंत 0 केले आहे

Price stabilization, onion export value is zero | भाव स्थिरावणार, कांदा निर्यात मूल्य झाले शून्य

भाव स्थिरावणार, कांदा निर्यात मूल्य झाले शून्य

Next

लासलगाव (नाशिक)- कांदा  बाजार भाव वेगाने कोसळत  असल्याचे पाहुन शुक्रवारी  सायंकाळी  केंद्र  सरकारने  अधिसूचना क्रमांक  48 /2 017 जारी करून कांदा  किमान  निर्यात  मुल्य 700 डाॅलर प्रतिटन  हे कमी करून पुढील  आदेश येईपर्यंत 0 केले आहे.त्यामुळे  कमी झालेली निर्यात वाढुन कांदा  भाव स्थिरावण्यास मदत होणार आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर  यांनी  या निर्णयाचे स्वागत करून वेगाने कोसळत  असलेले बाजार  आता काही प्रमाणात  टिकू न कांदा  उत्पादकांच्या नाराजी प्रमाण कमी होण्याकरिता  मदत होणार  आहे  असे सांगितले.
कांदा  भावांवर  नियंत्रणाकरीता केंद्र शासनाने  काल रात्री  850 डाॅलर प्रतिटन असलेले कांदा  निर्यात  किमान  निर्यात मुल्य 150 डाॅलर ने कमी करून 700 डाॅलर  इतकी कमी केली होती.

त्यामुळे  गेल्या  काही महीन्यात  कमी झालेली कांदा  निर्यात  पुन्हा जोरदार सुरू होण्याची आशा  आता किमान निर्यात  मुल्य  कमी करीत 0 इतके केले त्यामुळे  निर्यात  खुली होणार आहे.परिणामी  कांदा  उत्पादकांच्या  पल्लवित  झाल्या आहे. येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत  शासनाने 700 प्रतिटन निर्यात  मुल्य  केले होते. परंतु अठरा दिवस अगोदरच तातडीने हा निर्णय  घेतला आहे. नोव्हेबर अखेरपर्यंत देशात कांद्याचा दर सरासरी 35 रुपये किलो पातळीवर होता. तेव्हा सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणुन  किमान निर्यात मूल्य 850 डॉलर केले होते.

Web Title: Price stabilization, onion export value is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.