सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:41 PM2020-10-03T22:41:26+5:302020-10-04T01:09:12+5:30

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.

Prices of all leafy vegetables increased | सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाचा परीणाम : फळांची आवक मंदावली

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीकामांना अडथळा निमार्ण होत आहे. शेतात तयार असलेला भाजीपालाही शेतक?्यांना काढता येत नसल्याने त्याचा आवकेवर परीणाम झाला आहे. नाशिक बाजार समितीमध्ये गावठी कोथंबिरीला सध्या ४००० पासून १५ हजार रुपये शेकडा तर हायब्रीड कोथंबीरीला ५००० हजारापासून २२५०० रुपये शेकडा इतका दर मिळत आहे. हायब्रीड कोथंबीरीला गुजरातमध्यये चांगली मागणी असून गेल्या शुक्रवारी नाशिक बाजार समितीत कोथंबीरीची ३६००० जुडी इतकी आवक झाली होती. मेथी २५०० पासून ८५०० रुपये तर शेपु २००० ते ६००० रुपये , कांदापात २००० ते ७००० रुपये शेकडा या दराने विकली जात आहे. फळभाज्यांचे भाव टिकुन असून दोडक्यांची किमत वाढली आहे.

टमाट्याची आवक वाढल्याचे त्याचा दरावर परिणाम झाला आहे. तीन चार दिवसांपुवर्प पर्यंत टमाटा ११०० ते १२०० रु जाळी (२० किलो) या दराने विकले जात होते. शुक्रवारी टमाटा २५० ते ५०० रुपये जाळी या दराने विकला गेला.

फळांच्या आवकेवर परिणाम
बाजार समितीमध्ये सर्वच फळांची आवक खुपच कमी झाली आहे. सफरचंदाची अवघी २८० क्वंटल तर मोसंबीची १०५ क्विंटल इतकीच आवक झाली. डाळींबावर पावसामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्ययाने डाळींबाच्या आवकेवरही परीणाम झाला असून दरावरही परीणाम झाला आहे. आरक्ता डाळींबाला ३०० ते ५००० रुपये तर मृदुलाला ३०० ते १० हजार रुपये क्वंटल इतका दर मिळाला.

हातगाड्यावरुन कोथंबीर गायब
कोथंबीरीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या गाड्यावरुन कोथंबीर गायब झाल्याचे दिसुन येत आहे. किरकोळ दराने कोथंबीर विकणे परवडत नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मेथीच्या दरातही वाढ झाल्याने किरकोळ विक्रेते ३० ते ४० रुपये जुडी या दराने मेथी विक्री करत असल्याने अनेक गृहीणींचे आथिर्क गणित कोलमडले आहे.

 

Web Title: Prices of all leafy vegetables increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.