वर्षभरात अडीचशे रुपयांनी महागला घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक सिलिंडच्या किंमतीतही ४३७ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:33+5:302021-07-19T04:11:33+5:30

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून गतवर्षभरात तब्बल अडीचशे रुपयांनी घरगुती गॅस ...

Prices of commercial gas cylinders, which have gone up by Rs 250 during the year, have also gone up by Rs 437. | वर्षभरात अडीचशे रुपयांनी महागला घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक सिलिंडच्या किंमतीतही ४३७ रुपयांची वाढ

वर्षभरात अडीचशे रुपयांनी महागला घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक सिलिंडच्या किंमतीतही ४३७ रुपयांची वाढ

Next

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून गतवर्षभरात तब्बल अडीचशे रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. त्यासोबतच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसीडीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्यावर्षी जुलै ऑगस्टमध्ये ५९८ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता तब्बर ८३८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांतून पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. तर व्यावसायिक सिलिंडरही ४३७ रुपयांनी महागला असून त्यामुळे खाद्यपार्थही महागले असून त्याचा जनसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे.

शहरात चूलही पेटवता येत नाही. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर महागल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. परंतु घरात चूल पेटविणे शक्य नाही, अंगणात दगडांची चूल करून सिलिंडर अधिक दिवस पुरविण्याचा प्रयत्न करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

-रोहिनी सा‌ळवे, गृहिणी

सरकारने उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शन दिले. परंतु, सिलिंडर भरणेच परवडत नाही, त्यामुळे पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली आहे. घरात चूल पेटविता येत नाही, अंगणात चूल पेटविण्यासाठी मुलांना लाकडे जमविण्यासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे गॅस सिलिंडर भरण्याचा खर्च पुढे ढकलता येतो.

- अश्विनी पवार, गृहिणी

--

ऑगस्ट ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली दरवाढ

महिना - घरगुती - व्यावसायिक गॅस

ऑगस्ट - ५९८ - -११४५

सप्टेंबर - ५९८ - -११४६

ऑक्टोबर - ५९८ - -११७०

नोव्हेंबर - ५९८ - - १२४९

डिसेंबर - ६९८ - -१३४५

------

जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान झालेली दरवाढ

महिना - घरगुती - व्यावसायिक गॅस

जानेवारी - ६९८ - १३४५

फेब्रुवारी - ७७३ - १५५७

मार्च - ८२३ - १६४२

एप्रिल - ८१३ - १६७०

मे - ८१३ - १६७०

जून - ८१३ - १६७०

जुलै - ८३८ - १५८२

Web Title: Prices of commercial gas cylinders, which have gone up by Rs 250 during the year, have also gone up by Rs 437.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.