टमाट्याचे उत्पादन वाढल्यानेच भाव कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:05+5:302021-08-29T04:18:05+5:30

टमाट्यावर प्रक्रिया करुन पूरक उत्पादने तयारी करणारे चार ते पाच कारखाने असून एक ते दीड लाख मेट्रिक टन क्रशिंगची ...

Prices have plummeted due to increase in tomato production | टमाट्याचे उत्पादन वाढल्यानेच भाव कवडीमोल

टमाट्याचे उत्पादन वाढल्यानेच भाव कवडीमोल

Next

टमाट्यावर प्रक्रिया करुन पूरक उत्पादने तयारी करणारे चार ते पाच कारखाने असून एक ते दीड लाख मेट्रिक टन क्रशिंगची त्यांची क्षमता आहे. सध्या शेतात पिकणारा टमाटा थेट विक्रीसाठी बाजारात येत असल्याने जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये टमाट्याची आवक वाढलेली आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, दुबई आदी देशांमधूनही फारशी मागणी नाही. स्थानिक बाजारांमध्येही मागणी नसल्याने अनेक व्यापारी टमाटा खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. सर्वच ठिकाणी टमाट्याचा उठाव कमी झाल्याने मागील आठ दिवसांपासून सातत्याने टमाट्याचे दर कोसळत आहेत. बाजारात मिळणारा दर आणि टमाट्याला लागणारा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकरी संतप्त झाले आहेत.

चौकट -

तालुकानिहाय टमाटा लागवड क्षेत्र (हेक्टर)

नाशिक - १८२४, इगतपुरी - ४८०, पेठ- २३८, त्र्यंबक- ६४, निफाड- २५००, सिन्नर- १७८७, येवला - २४०, चांदवड- २६१२, मालेगाव - १९२, सटाणा - ११८२, नांदगाव- २१७, दिंडोरी - ७३५१, देवळा - १०२

चौकट-

द्राक्ष उत्पादक वळाले टमाट्याकडे

मागील दोन तीन वर्षांपासून द्राक्षाला मिळणारा कवडीमोल दर, सरकारचे निर्यात धोरण यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालविली आहे. कमी दिवसांत येणारे नगदी पीक म्हणून शेतकरी टमाट्याकडे वळाले आहेत. याशिवाय ज्यांना मागील वर्षी टमाट्याला चांगला दर मिळाला आहे त्यांनी यावर्षी टमाटा लागवडीचे क्षेत्र वाढविले आहे. याशिवाय बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत अनेक शेतकरी दर्जेदार उत्पादन घेऊ लागले आहेत. अनेकांची उत्पादकता वाढली असल्याने यंदा टमाट्याचे भरघोस पीक आले आहे.

चौकट-

मागील आठ दिवसांतील टमाट्याचे सर्वसाधारण दर (क्विंटलमध्ये)

१९ ऑगस्ट - ७०५

२० ऑगस्ट - ६०३

२१ ऑगस्ट - ५७८

२२ ऑगस्ट - ५५३

२३ ऑगस्ट - ५५३

२४ ऑगस्ट - ४५३

२५ ऑगस्ट - ४२८

२६ ऑगस्ट -५०३

२७ ऑगस्ट - ३००

Web Title: Prices have plummeted due to increase in tomato production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.