कांदाच्या भावात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:38 PM2018-12-10T22:38:08+5:302018-12-10T22:38:21+5:30
खामखेडा : मागील दोन वर्षापुर्वी प्रंचड भावाने विकला गेलेला लाल कांदाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा : मागील दोन वर्षापुर्वी प्रंचड भावाने विकला गेलेला लाल कांदाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
कांघ्याच्या दरात दररोज घसरना होताना असतानाही खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या पुढे कांद्या काय होईल याचा विचार न करता पुढे परिस्थित बदल होऊन कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकावर गुंतवणूक करीत आहे.चालु वर्षी जरी उन्हाळी कांद्याचे तोट्यात आला असला तरी शेतकरी महागडी असे कांद्याची रोपे विकत घेऊन उन्हाळी कांद्याची लागवड करीत आहे.
चालु वर्षी उशिरा पाऊसामुळे लाल कांद्याची लागवड उशिरा झाली आहे दरवर्षी लाल कांद्याची लागवड आॅगस्ट मिहन्यात केली जाते.तेव्हा आॅक्टोबर मिहन्यात लाल कांदा बाजारात दाखल होता.परंतु चालु वर्षी शेतकर्याने सुरवातीच्या पावसावर लाल कांद्याचे बियाणे टाकले.
नंतर पाऊस न झाल्याने विहीरिणा पाणी न उतरल्यामुळे लागवडी साठी तयार झालेले कांद्याचे रोपे लागवड करता आली नाही.पाऊस पडल्यामुळे पुन्हा शेतकर्याने कांद्याच्या बियाणाचा शोध करून पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लाल कांद्याची लागवड केली. सुरवातील लाल कांद्याला चागल्या पैकी भाव होता. आता सर्वत्र लाल कांदा काढण्याचे कामे चालु आहे.
या वर्षी लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे.त्यामुळे लाल कांद्याच्या भावामघ्ये मोठ्या प्रमाणात घसरणा झाली आहे.पाहिजे त्या प्रमाणात चांगला भाव मिळत नाही.त्यात लाल कांदा हां जास्त दिवस जमिनीत ठेवता येत नाही.व चाळीतही साठवत येत नाही त्यामुळे तो काढणी केल्यानंतर विक्र ी केल्या शिवाय शेतकरयाजवळ पर्याय नाही. जर लाल कांद्याचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर बियाणे,लागवडीचा खर्च ,खते,तर एकरी पंधरा ते वीस खर्च होतो.सुरवातीला जो लाल कांदा १५०० ते २५०० रु पया रु पयापर्यत विकला जात होता तोच कांदा आता पाचशे ते नऊ रु पये हजार रु पये दरम्यान विक्र ी्री होत आहे चालु वर्षी उन्हाळी कांदा कविडमोल भावाने विकला जात आहे. आता सध्या तरी उन्हाळी कांद्याची मोठी बिकट अवस्था झाली आहे.
बाजातरात नेल्यावर व्यापारी उन्हाळी कांदा घेण्यास नाखुश आहेत.तो अगदी लूट भावाने विकला जात आहे.त्यामुळे काही वेळेस वाहनाचे भाडे सुद्धा मिळत नाही.नांदूरशिंगोटेत भाव कोसळल्याने नाराजीनांदूरशिंगोटे : सद्य: स्थितीत कांद्याचे भाव कोसळल्याने कांदाउत्पादक शेतकरी हवालिदल झाले आहेत. दोनशे ते तीनशे रूपये क्विंटलपर्यंत कांद्याचे भाव पडले आहेत.मातीमोल भावाने कांदा विकला जात असल्याने शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहू लागले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात शेतक-यांनी मोठया प्रमाणात कांदा लागवड केली होती. यावर्षी कांद्यास चांगला भाव मिळेल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती. मात्र, मोठया प्रमाणात कांदा आवक वाढू लागल्याने त्याचा परिणाम भावात घसरण होण्यावर झाला. रोपे व बियाणे, खते, मशागत, कांदा लागवड, काढणी, कापणी, वाहतूक असा कांद्यास क्विंटलला पाचशे रूपयांहून अधिक उत्पादन खर्च येत आहे. सध्या उन्हाळ कांद्यास क्विंटलला दोनशे ते तीनशे रूपये भाव मिळत असल्याचे चित्र आहे. परिसरातील शेतकºयांनी उन्हाळ कांदा तब्बल सात ते आठ महिने सांभाळत साठवून ठेवला होता. कांद्याच्या भावात सर्वच ठिकाणी घसरण झाल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत.