कांदा भावात ५०० रूपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:35 PM2018-01-31T14:35:12+5:302018-01-31T14:35:30+5:30

लासलगाव (नाशिक) : सोमवारपेक्षा आज बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे तर सरासरी भावात ३०० रूपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली.परंतु बाजारभाव प्रती क्विंटल किमान ९५० रूपये कमाल भाव १९०५ तर सरासरी भावाची पातळी १६५० रूपये इतकी होती.

Prices of onion declined by Rs. 500 to Rs | कांदा भावात ५०० रूपयांनी घसरण

कांदा भावात ५०० रूपयांनी घसरण

Next

लासलगाव (नाशिक) : सोमवारपेक्षा आज बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे तर सरासरी भावात ३०० रूपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनातून झाली.परंतु बाजारभाव प्रती क्विंटल किमान ९५० रूपये कमाल भाव १९०५ तर सरासरी भावाची पातळी १६५० रूपये इतकी होती.
सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात ३०० रु पयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२०० रु पयांची मोठी घसरण होत कांदा दोन हजार रु पयांच्या आत आल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मागील सप्ताहात ८५,५४४ क्विंटल झाली होती तर किमान भाव १,००० तर कमाल भाव ३१५८ व सरासरी भाव २८५३ रूपये होते.
कोलंबो वगळता थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्य भरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट वाढती आवक व गुजरातसह मध्यप्रदेश व इतर राज्यांत झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यात लासलगाव सह विविध बाजारपेठेत वेगाने कांदा भावात वेगाने घसरण होत झाला. मागील सप्ताहात मंगळवारच्या तुलनेत सोमवारी किमान भावात ६०० कमाल भावात ७५२ तर सरासरी भावात नऊशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली. मागील सप्ताहात दि.२३ जानेवारी रोजी १७,१६८ क्विंटल कांदा लिलावात किमान १५०० , कमाल ३१५२ तर सरासरी भाव २८५१ रूपये होते.या सप्ताहात सोमवारी लिलावात किमान , कमाल व सरासरी भावात.या वर्षी विक्र मी वेगाने घसरण होत १९१५६ क्विंटल कांदा लिलावात किमान ९००, कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ रूपये भाव जाहीर झाला.
-------------------------
गुजरातबरोबरच मध्यप्रदेश सह इतर राज्यांत नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाल्याने सोमवारपासनु कांदा भावात कमालीची घसरण झाली. कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे कांदा एकरी उत्पादन चांगले हाती येत आहे. तसेच पुणे, लोणंद व अहमदनगर भागातील कांदा बाजारपेठेत दुप्पट तिप्पट आवक आली . कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत दाखल झाला आहे.कांदा आवक वाढलेली असताना कांदा किमान निर्यात मुल्य १५० डॉलर कमी करून ७००डॉलर प्रतिटन झाले आहे, परंतु कोलंबो वगळता कुठेही निर्यात नाही.

Web Title: Prices of onion declined by Rs. 500 to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक