कांदा रोपांचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:31 AM2019-11-26T00:31:41+5:302019-11-26T00:35:17+5:30

देवळा : कांद्याला मिळत असलेला उच्चांकी दर व परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. यामुळे कांद्याच्या तयार रोपांना मोठी मागणी आहे. परंतु परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाल्यामुळे सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने असून, रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत.

The prices of onion plants increased | कांदा रोपांचा भाव वधारला

वाजगाव येथे कांदा पिकावर तणनाशक औषधांची फवारणी करताना महिला.

googlenewsNext
ठळक मुद्देलागवडीला वेग : देवळा तालुक्यात शेतकऱ्यांची रब्बीसाठी लगबग

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : कांद्याला मिळत असलेला उच्चांकी दर व परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. यामुळे कांद्याच्या तयार रोपांना मोठी मागणी आहे. परंतु परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाल्यामुळे सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने असून, रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत.
चालू वर्षी सुरुवातीला पावसाने पाठ फिरविल्यामुळे देवळा तालुक्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. उत्तरार्धात परतीच्या पावसाने हात दिल्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले असले तरी, परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने कांद्याची तयार रोपे सडून गेली. दोन ते तीन टप्यात टाकलेल्या या रोपांचे १०० टक्के नुकसान झाल्यामुळे खरिपाच्या कांद्याची लागवड लांबणीवर पडली. ज्या शेतकºयांनी खरीप कांद्याची लागवड वेळेवर केली होती त्याचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. खरिपाचा कांदा अद्यापही बाजारात न आल्यामुळे उन्हाळी कांद्याला मोठी मागणी आहे. परंतु उन्हाळी कांदादेखील संपत आला असून, डिसेंबर ते फेब्रुवारी अशी तीन महिने रांगडा कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याची टंचाई निर्माण होणार असून, यामुळे कांद्याचे दर आजपर्यंतचे उच्चांकी दर मोडीत काढून नवीन उच्चांक प्रस्थापित करेल अशी चर्चा शेतकºयांमध्ये सुरू आहे.फेकलेल्या कांद्यालाही सोन्याचा भाव !कांद्याने उच्चांकी गाठल्यामुळे निकृष्ट व खराब झालेल्या कांद्यालादेखील सोन्याचा मोल प्राप्त झाला आहे. यामुळे उकिरड्यावर टाकून दिलेला कांदा जमा करून शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

Web Title: The prices of onion plants increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.