इतर वस्तुंचे दर वाढले मात्र भाजीपाला कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:35+5:302021-03-21T04:14:35+5:30
मात्र एकाही राजकीय पक्षाने किंवा शेतकरी संघटनेने त्या विरोधात आंदोलन केले नसल्याची खंत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात ...
मात्र एकाही राजकीय पक्षाने किंवा शेतकरी संघटनेने त्या विरोधात आंदोलन केले नसल्याची खंत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करुन पिकविलेला माल किती दिवस कवडीमोल दराने विकायचा याचा विचार शेतकऱ्यांनी करावा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
मागील लोकडाऊन नंतर शेती सोडून सर्वच मालाचे भाव २५ ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. आज दुचाकीच्या किमती २० ते ५० हजारांनी तर चारचाकी १ ते ३ लाखानी वाढल्या आहेत. कोरोनाच्या आधी ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी होती. हीच परिस्थिती सिमेंट लोखंड शेती औजारे खते बियाणे कीटकनाशके व डिझेल पेट्रोलच्या बाबतीत आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात देशाला सावरणाऱ्या बळी राजाला आज दुय्यम वागणूक दिली जाते आहे. नाशिकमधील शेती ही गेल्या २ दशकात खर्चिक झाली आहे. त्यामुळे शेतीवर आधारित बाजारपेठेत दरवर्षी करोडोची उलाढाल होत आहे पण शेतकरी दिवसोदिवस खड्यात जाताना दिसत आहेत.
त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे हे औषध मारा हे ब्लोअर घ्या ती व्हरायटी लावा ती ड्रीप वापरा ह्या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होतोय याच्या एक टक्का ही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे. जर या बाबतीत शेतकरीच गंभीर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार साधे निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही. भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो त्यामुळे उत्पादन खर्च खूप जास्त आहे त्याप्रमाणे जर बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर एवढे महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने विकायचा याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत खृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.