नाशकात डाळिंब १०० रुपये प्रति किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:56 PM2018-04-11T17:56:54+5:302018-04-12T11:52:13+5:30
पंधरवाडयापासून बाजारभाव तेजीत, ३० टक्के आवक
पंचवटी : एरवी ३० ते ४० रूपये प्रति किलो दराने विक्र ी होणाऱ्या डाळिंब फळाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळबाजारात डाळिंबाला प्रति किलो १०० रूपये असा बाजारभाव बाजारभाव मिळत आहे.
नाशिक बाजारसमितीत संगमनेर, अहमदनगर, सटाणा, देवळा या भागातील डाळिंब माल विक्र ीसाठी दाखल होत असून नाशिकमधील व्यापारी हाच डाळिंब दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या भागात निर्यात करीत आहेत. या शिवाय नेपाळमध्ये मोठया प्रमाणात डाळिंब निर्यात केला जात असतो मात्र काही दिवसांपासून आवक घटल्याने नेपाळला पाठविल्या जाणाºया डाळिंब मालाची निर्यात काही प्रमाणात घटली असल्याचे डाळिंब व्यापाºयांनी सांगितले.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम डाळिंब उत्पादनावर झाल्याने डाळिंब मालाची आवक घटली आहे. डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळाने डाळिंब फळाच्या कळया, फूल, सुकल्याने तसेच झडल्याने यावर्षी डाळिंब मालाचे उत्पादन घटले आहे. नाशिक बाजारसमतिीत दैनंदिन केवळ ३० ते ३५ टक्के आवक होत असून या गोड व दाणेदार डाळिंबाला उन्हामुळे मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे.