भाज्यांचे दर कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:42+5:302020-12-06T04:14:42+5:30

नवीन सीबीएसला पार्किंगचा वेढा नाशिक : नवीन सीबीएस परिसरात कुटुंबीयांना सोेडायला येणारे नागरिक तसेच त्या भागातील दुकानांमध्ये येणाऱ्या ...

Prices of vegetables are low | भाज्यांचे दर कमीच

भाज्यांचे दर कमीच

Next

नवीन सीबीएसला

पार्किंगचा वेढा

नाशिक : नवीन सीबीएस परिसरात कुटुंबीयांना सोेडायला येणारे नागरिक तसेच त्या भागातील दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जात असल्यामुळे नवीन सीबीएससमोरील तसेच सिव्हिलच्या वॉलकंपाऊंडकडील दोन्ही बाजू या वाहनांनी व्यापून जातात. त्यामुळे त्या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

------------

तरणतलावानजीकचे

वळण खुले करावे

नाशिक : सावरकर तरणतलावाजवळून सिव्हिलकडे वळण घेणाऱ्या रस्त्याच्या बाजूने सायकल ट्रॅकचे काम सुरू करण्यात आल्यानंतर तेथील प्रवेशमार्ग बंद करण्यात आला होता, मात्र काम पूर्ण होऊनदेखील तो रस्ता अद्याप सुरू झाला नसल्याने तो सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

------

पदपथ विक्रेत्यांनी

व्यापले रस्ते

नाशिक : महानगरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश रस्ते हे पदपथ विक्रेत्यांनी व्यापले असल्याने नागरिकांना बाजारपेठेतून चालण्यसाठी मुख्य रस्त्याचाच वापर करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत पादचाऱ्यांची अधिक भर पडून संपूर्ण रस्ताच ठप्प होण्याचे प्रकार शनिवार, रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशी घडत आहेत.

-------------

वाहनांचे रस्त्यांवर

पार्किंग ठरते अडथळा

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील विविध कार ॲक्सेसरीज दालनांसमोर मोठ्या प्रमाणात कारचे पार्किंग केले जात असल्याने त्या रस्त्यावरून अन्य वाहनांना वाहतुकीस अडथळा ठरत आहे. प्रारंभी केवळ दुकानांजवळील रस्त्यावर असलेले पार्किंग आता थेट मुख्य रस्त्याचा पावपेक्षा अधिक भाग व्यापू लागल्याने वाहतुकीत अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत.

----------

Web Title: Prices of vegetables are low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.